नामनिर्देशित नगरसेवक पालिकेत प्रवेश करण्यासाठी हालचालीना वेग

मुंबई मुंबई शनिवार ( प्रतिनिधी ) – सोन्याची अंडी देणा-या पालिकेत सत्ता पुन्हा शिवसेनेची येणार हे आता जवळजवळ निश्चित झाले आहे याबाबत जोरदार चर्चा शिवसेनेत सुरू आहे.एकीकडे सत्तेची मोर्चेबांधणी पक्षांकडून केली जात असतानाच दुसरीकडे नामनिर्देशित सदस्य म्हणून महापालिकेत प्रवेश करण्यासाठी राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

मुंबई महापालिकेत चार अपक्षांसह शिवसेनेचे 88 एवढी सदस्य संख्या झाली आहे. तर भाजपाचे संख्या 82 एवढी झाली आहे आणि काँग्रेसचे 31 नगरसेवक निवडून आले आहे. महापालिकेत सध्या 227 नगरसेवक असून याव्यतिरिक्त पाच नामनिर्देशित सदस्यांची निवड केली जाते. त्यानुसार शिवसेना आणि भाजपाचे प्रत्येकी दोन आणि काँग्रेसचा एक नामनिर्देशित सदस्यांची निवड केली जाणार आहे. या नामनिर्देशित सदस्यत्वासाठी शिवसेना, भाजपा आणि काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेच्यावतीने प्राध्यापक अवकाश जाधव आणि अॅडव्होकेट मेहराज शेख हे दोन विद्यमान नामनिर्देशित सदस्य आहेत. हे दोन्ही सदस्य युवासेनेशी निगडीत असल्यामुळे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या शिफारशीनुसार निवड करण्यात आली होती. परंतु नव्या महापालिकेतही दोन सद्स्य हे आदित्य ठाकरे यांच्या शिफारशीनुसारच देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्यावतीने ज्या दोन सद्स्याची निवड होणार आहे. त्यामध्ये निवडणुकीत पराभूत झालेल्या एका विद्यमान नगरसेवकाचा समावेश आहे. यामध्ये डॉ. अनुराधा पेडणेकर, डॉ. शुभा राऊळ, शैलेश फणसे आणि तृष्णा विश्वासराव यांची नावे चर्चेत आहेत. भाजपाकडूनाही एक माजी नगरसेवक आणि पक्षाबाहेरील सदस्य अशाप्रकारे निवड केली जात आहे. तर काँग्रेसच्या एका जागेसाठी शीतल म्हात्रे, विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा, संदेश कोंडविलकर, भूषण पाटील आदींची नावे चर्चेत आली आहे. काँग्रेसचे जे 31 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामध्ये एकही गुजराती तथा मारवाडी चेहरा नाही. त्यामुळे घाटकोपरमध्ये पराग शहाला कडवी झुंज देणारे विरोधी पक्षनेता प्रवीण छेडा यांच्या नावाचा विचार पक्ष करत आहे. 

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget