मुंबई शनिवार ( प्रतिनिधी ) –पालिकेच्या सन २०१७-१८ करिता 'एम/पूर्व' प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी आज शनिवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार समृद्धी गणेश काते या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
गोवंडी येथील‘एम/पूर्व’ प्रभागात शिवसेनेचे ६, भा.ज.प.चे १, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे १, राष्ट्रवादी काँग्रेसचे १, समाजवादी पक्षाचे ५ आणि एमआयएमचे १ असे एकूण १५ सदस्य आहेत.आज शनिवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेना पक्षाकडून समृद्धी गणेश काते यांना तर समाजवादी पक्षाकडून अख्तर अब्दुलरज्जाक कुरेशी यांना उमेदवारी देण्यात आली होती. निवडणुकप्रसंगी अख्तर अब्दुलरज्जाक कुरेशी यांनी विहित मुदतीत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे समृद्धी गणेश काते या बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. या निवडणुकीच्या पीठासीन अधिकारी म्हणून उपमहापौर हेमांगी वरळीकर यांनी कामकाज सांभाळले.

Post a Comment