मुंबईत आज मतमोजणी - उमेदवारांच्या काळजात धडकी


मुंबई, बुधवार (प्रतिनिधी)- राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेच्या निकालाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. उद्या (२३ फेब्रुवारी) या निवडणुकीची मतमोजणी होत आहे. २४ प्रभागातील २२७ जागांसाठी २३ केंद्रावर मतमोजणी पार पडणार आहे. यावेळी कोणाताही अनुचित प्रकार घडून मतमोजणीला गालबोट लागू नये, यासाठी मतमोजणी स्थळी पोलीस, सुरक्षारक्षकांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मंगळवारी पार पडलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ५५. ५० टक्के इतके विक्रमी मतदान झाले. महापालिकेच्या २२७ वॉर्डातून २ हजार २७५ मतदान नशीब आजमावत आहेत. आज सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. महापालिकेच्या २३ केंद्रावर एकाचवेळी मतमोजणीची प्रक्रिया सुरु होईल . त्यासाठी ७२९ टेबल मांडण्यात येणार आहे. एका टेबलावर साधारण ८ ते ११ वॉर्डांची मते मोजली जाणार आहेत. अंधेरी येथील मतदान केंद्रावर सर्वाधिक १३ वॉर्डांची मतमोजणी होणार असल्याने येथे ९१ टेबल लावली आहेत. त्याखालोखाल मालाड येथील केंद्रावर ४८ टेबल आहेत. आझादमैदान, नागपाडा, ना. म. जोशी मार्ग, काळाचौकी, सायन, दादर, नेहरुनगर, देवनार, चेंबूर, पार्कसाईट, मुलुंड, पंतनगर, वाकोला, वांद्रे, आंबोळी, अंधेरी, साकीनाका, मालाड, दहिसर, बोरीवली, कांदीवली, गोरेगांव आणि दिंडोशी अशा एकूण २३ मतदान केंद्रावर मतमोजणी होणार आहे.

केंद्राच्या ठिकाणापासून २०० मीटर परिसरात निर्बंध घालण्यात आले आहेत. मोबाईल, कॉर्डलेस,पेजर वापरण्यास आणि खासगी वाहनांना बंदी आहे. तसेच कोणताही मजकूर लिहिण्यास किंवा छापील मजकूर प्रदर्शित करण्यासही बंदी घातली आहे. मतमोजणीच्या वेळी कायदा- सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस, होमगार्ड, केंद्र व राज्य राखीव दलाच्या तुकड्या देखील तैनात केल्या आहेत. तसेच मतमोजणीच्या वेळी केंद्राबाहेर विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी होणार हे गृहीत धरून वाहतूक शाखेने वाहतूक मार्गात बदल केला आहे. अनेक मतदान केंद्र असलेल्या परिसरात वाहनांना पार्किंग करण्यास देखील बंदी आहे.

कुर्ल्याचा पहिला तर अंधेरीचा निकाल शेवटी कुर्ला पश्चिम येथे सर्वात कमी १० टेबल असून, याठिकाणी ८ वॉर्डांची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे कुर्ल्याचा निकाल पहिला घोषित होऊ शकतो. अंधेरी येथील मतदान केंद्रावर सर्वाधिक ९१ टेबल असून, त्याठिकाणी १३ वॉर्डांची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे अंधेरीतील वरदानच निकालसगळ्यात उशिरा घोषित होणार आहे.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget