मतदारांच्या सोयीसाठी 'एन्ड्रॉईड ऍप व संकेतस्थळ' कार्यान्वित

मतदान चिठ्ठ्यांचे वाटप अंतिम टप्प्यात
मतदाराच्या नावाने शोधता येणार मतदान केंद्र !
मुंबई शनिवार ( प्रतिनिधी ) – येत्या २१ फेब्रुवारी रोजी पालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे. भारत निवडणूक आयोगाच्या ५ जानेवारी च्या मतदार यादीमध्ये ज्यांची नावे असतील त्यांनाच मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. या मतदार यादीनुसार मतदान चिठ्ठ्यांचे वाटप पालिकेद्वारे करण्यात येत असून ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. त्याचबरोबर ही संपूर्ण मतदार यादी ही पालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचबरोबर https://localbodyvoterlist.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मतदाराच्या नावाच्या आधारे मतदान केंद्र शोधण्याची सुविधा उपलब्ध आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) संजय देशमुख यांनी दिली आहे.
याशिवाय मतदारांनी कुठे व कोणत्या मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी जावे? ही माहिती शोधणे सुलभ होण्याच्या दृष्टीने ऍन्ड्राईड ऍप देखील राज्य निवडणूक आयोगाद्वारे तयार करण्यात आले आहे. तसेच एका खाजगी संस्थेच्या मदतीने तयार करण्यात आलेले 'https://operationblackdot.in' हे संकेतस्थळ देखील मतदारांच्या सुविधेसाठी उपलब्ध आहे. या संकेतस्थळावर देखील मतदाराच्या नावाच्या आधारे मतदान केंद्र शोधण्याची सुविधा उपलब्ध आहे. वर्ष २०१२ च्या सार्वत्रिक निवडणुकी दरम्यान मतदानासाठी १ हजार ४५२ ठिकाणी मतदान केंद्रे होती. या निवडणुकीत १०८ मतदान केंद्रे ही नव्याने झाली आहेत. यानुसार यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये १ हजार ५६० ठिकाणी ७ हजार ३०४ मतदान केंद्रे आहेत. तसेच यावेळी प्रभाग रचना व प्रभाग सीमा देखील बदलल्या आहेत. त्यामुळे मतदारांनी गेल्या निवडणुकीत ज्या ठिकाणी मतदान केले असेल, त्याच ठिकाणी यावेळी मतदान केंद्र असेलच असे नाही. ही बाब लक्षात घेता मतदारांनी आपले मतदान केंद्र कुठे आहे याची खातरजमा मतदान चिठ्ठीच्या आधारे अथवा संबंधित संकेतस्थळाद्वारे किंवा ऍन्ड्रॉईड ऍप द्वारे करावी, असेही अतिरिक्त आयुक्त देशमुख यांनी नमूद केले आहे.'True Voter' या ऍन्ड्राईड ऍपच्या मदतीने मतदाराला आपल्या नावाच्या आधारे किंवा मतदार क्रमांकाच्या आधारे मतदान केंद्र शोधता येणार आहे. विशेष म्हणजे हे ऍप जीपीएस सुविधेला जाडलेले असल्याने या ऍपच्या आधारे मतदाराला मतदान केंद्रावर जाण्याचा मार्ग देखील समजू शकणार आहे. हे ऍप 'गुगल प्ले स्टोअर' वरती मोफत उपलब्ध आहे.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget