मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या महासचिव आणि अभिनेत्री नगमा या 14 फेब्रुवारीपासून मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होणार आहेत. 14 ते 18 फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण मुंबईभर त्यांचा रोड शो आणि सभा होणार आहेत. गोरेगाव, मुलुंड, लोखंडवाला, जोगेश्वरी, अंधेरी पूर्व, सांताक्रूझ पश्चिम, दक्षिण मुंबई आणि बोरिवली या ठिकाणी रोड शो तर उर्वरित ठिकाणी रोड शो व सभा होणार होणार आहेत. दक्षिण मुंबईतील रोड शो मध्ये माजी खासदार मिलिंद देवरा सहभागी होणार आहेत, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली.
Post a Comment