मुंबई गुरवार ( प्रतिनिधी ) – पालिकेच्या २१ फेब्रुवारी रोजी होणा-या निवडणुकीसाठी गुरुवारी एकूण ४५६ अर्ज दाखल झाले आहेत. २७ जानेवारीपासून अर्ज स्विकारण्यास सुरुवात झाली असून, आत्तापर्यंत गेल्या सात दिवसांत ६२२ उमेदवारांनी अर्ज •भरले आहेत. शुक्रवारी, ३ फेब्रुवारी रोजी अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिवस आहे.
आॅनलाईन उमेदवारी अर्ज •भरण्याची शुक्रवारी सायंकाळी चारवाजेपर्यंतच मुदत निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. गुरुवारी सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीवरुन नाराजी आणि बंडाचे झेंडे फडकवले गेल्याने नेतेमंडळी संबंधित उमेदवारांची नाराजी दूर करण्यात गुंतले होते. त्यात काहींना यश आले असले तरी, नाराज उमेदवारांची मने वळवण्यासाठी रात्री उशीरापर्यंत नाकदू-या काढण्याचे काम सुरु होते. शुक्रवारी अर्ज •भरण्याची अखेरची मुदत असल्याने सर्व राजकीय पक्षांचे नेते पक्षांतर्गत कोणताही दगाफटका होऊ नये याची पूरेपूर काळजी घेत आहेत. तरीही इच्छुकांची संख्या मोठी असल्याने नेत्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. अखेरच्या दिवशी नाराज उमेदवारांची मनधरणी करताना नेत्यांच्या तोंडाला फेस येण्याची शक्यता आहे. दरम्यान, काहींना गुरुवारीच उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यावर, शुक्रवारी बंडखोरी किंवा अपक्ष उमेदवारी अर्ज •भरण्याची दाट शक्यता आहे.

Post a Comment