आता पालिका निवडणूक काँग्रेस एकजुटीने लढणार- भुपेंद्रसिंग हुड्डा

कामत - निरुपम वादावर कोर कमिटीच्या बैठकीच चर्चा
27 जानेवारीला काँग्रेस पहिली उमेदवार यादी जाहीर करणार
मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – पालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेमधला उफाळून आलेला वाद मिटवण्यासाठी काँग्रेसचे नेते भूपेंद्रसिंग हुड्डा यांना थेट दिल्लीतून मुंबईत यावे लागले आहे. बुधवारी झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत कामत - निरुपम गटातल्या वादावर चर्चा झाली. मात्र या बैठकीला काँग्रेसचे नेते गुरुदास कामत मुंबई बाहेर असल्याने उपस्थित राहिले नाही. 17 जणांच्या कोर कमिटीपैकी 15 सदस्य बैठकीला उपस्थित होते. काँग्रेसच्या अंतर्गत प्रश्न आहे, तो आम्ही आपसांत मिटवू. पालिका निवडणुकीत काँग्रेस एकजुटीने लढेल असा विश्वासही हुड्डा यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. दरम्यान येत्या 27 जानेवारीला काँग्रेस आपली पहिली यादी जाहीर करणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसमधील कामत- निरुपम गटातला वाद उफाळून आला आहे. अंतर्गत वादाला कंटाळून काहींनी पक्षाला रामराम ठोकला आहे. काही दिवसांपूर्वी नगरसेवक परमिंदर भामरा व माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी पक्षाला रामराम ठोकून भाजपची वाट धरली. हेग़डे यांनी निरुपम यांच्या एकाधिकारशाहीला कंटाऴून राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. तर नगरसेविका वखारुनिस्सा अन्सारी यांनीही एमआयएममध्ये प्रवेश केला. उमेदवार तिकीट वाटपावरून कामत - निरुपम यांमधील वाद विकोपाला गेला. निरुपम यांची कार्यपध्दत नकारात्मक आहे. त्यामुळे आपण निवड प्रक्रियेतून बाहेर पडत असल्याचे कामत यांनी आपल्या समर्थकांना मेसेज पाठवून कळवले. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधला हा वाद अधिक चिघळू नये यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिल्लीवरून थेट भूपेंद्रसिंग हुड्डा यांना मुंबईत पाठवले. हुड्डा यांनी कोर कमिटीची बैठक घेऊन या वादावर चर्चा केली. पालिका निवडणूकीबाबतही चर्चा करण्यात आली असून उमेदवारांची पहिली यादी येत्या 27 जानेवारीला जाहिर करण्याची तयारी काँग्रेसने केली असल्याचे निरुपम यांनी सांगितले. दरम्यान बुधवारी झालेल्या बैठकीसाठी मोहन प्रकाश, भाई जगताप, एकनाथ गायकवाड, प्रिया दत्त, संजय निरुपम, सुरेश शेट्टी, जनार्दन चांदूरकर , कृपाशंकर सिंग, मिलिंद देवरा, कालिदास कोळंबकर, अस्लम शेख, अमीन पटेल, बाबा सिद्दीकी, वर्षा गायकवाड, चरणसिंग सप्रा हे सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget