महापालिका निवडणुकीनंतरच मुंबईकरांना पेंग्विन दर्शन

मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – पालिकेच्या भायखाळा वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान राणीबाग़मध्ये पेंग्विन आणून सहा महीने झाले तरी त्यांच्यासाठी असलेल्या सोयी सुविधा करण्यात पालिकेला अपयश आले आहे. पेंग्विनसाठी राणीबाग़ मधील बनवण्यात येणारे काचघर अद्याप सोयी सुविधानी पूर्ण झाले नसल्याने पेंग्विन दर्शन आता मुंबई महापालिकेच्या निवडनुकीनंतरच म्हणजे 21 फेब्रुवारीनंतरच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 
मुंबईच्या राणीबाग मध्ये शिवसेनेचे युवा अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हट्टाखातर आणण्यात आले. जुलै महिन्यात 8 पेंग्विन राणीबाग़मध्ये दाखल झाल्यानंतर एकाच महिन्यात एका पेंग्विनचा मृत्यु झाला. यामुले राजकारण तापू लागले. विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा यांनी लोकायुक्तांकड़े तक्रार केली असता पेंग्विन मृत्यूची चौकशी सुरु आहे.अशी चौकशी सुरु असतानाच पालिकेमध्ये पेंग्विन पाहण्यासाठी 100 रुपये व 12 वर्षाखालील बालकाना 50 रुपये शुल्क आकारणीचा तसेच सध्याचे प्रवेश शुल्क 10 पटीने वाढीचा प्रस्ताव गटनेता बैठकीत सादर करण्यात आला होता. प्रशासनाचा प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेने फेटाळला. प्रस्ताव फेटाळताना मार्च अखेर पर्यंत 12 वर्षाखालील बालक व त्यांच्या पालकांना मोफत प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी पत्रकारांना दिली होती.याच वेळी राणीबाग़ मध्ये पेंग्विनच्या पाहणीसाठीची तयारी येत्या 20 दिवसात पूर्ण होणार असून 25-26 जानेवारीला महापालिका शालेतून प्रथम क्रमांक पटकवलेल्या विद्यार्थ्यांकडून याचे उदघाटन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र पेंग्विन ठेवण्यासाठी लागणारे काचेचे घर दोन तीन दिवसापुर्वीच तयार करण्यात आले आहे. यामध्ये पेंग्विनसाठी लागणारा ठंडावा राखण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या नंतर पेंग्विनना या घरामध्ये ठेवून ते या घरात राहतात का याची पाहणी केली जाणार आहे. यासाठी आणखी 12 ते 15 दिवस लागणार आहे. याच दरम्यान 21 फेब्रुवारीला मुंबई महापालिकेच्या निवडणुका असल्याने मुंबईकरांना पेंग्विन पाहण्यास निवडणुकीनंतरच मिळण्याची शक्यता आहे.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget