मुंबई, सोमवार (प्रतिनिधी)- महापालिका निवडणुकीत युतीबाबत वाटाघाटी सुरू असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, असे सांगत शिवसेनेचा 'वचननामा' जाहीर केला. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म दिवस आमच्यासाठी खूप महत्वाचा असल्याने आम्ही मुंबईच्या विकासासाठी वचनबध्द झालो आहोत. तसेच सर्व महापालिकांमध्ये शिवसेनेचा झेंडा फडकवणार, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. दरम्यान, युतीबाबत विचारलेल्या प्रश्नांवर थोडक्यात उत्तरे दिली.
शिवसेनेच्या वचननाम्यात केलेली कामे आणि निवडून आल्यानंतर पुढची पाच वर्षे केली जाणारी कामे मांडली आहेत. सगळ्या बाजूंचा अभ्यास करून हा वचननामा तयार केला आहे. मात्र, इथून मंगळावर जाण्यासाठी पूल बांधू, इथं विमानतळ बांधू असे कोणतेही अवास्तव आश्वासन दिलेन नाही, असा टोला ठाकरे यांनी भाजपला लगावला. केवळ भाजपला विरोध करायचा म्हणून मी केलेला नाही, असा खुलासा त्यांनी यावेळी केला. तसेच आरे कॉलनीतील कारशेडबाबत पर्यावरणतज्ज्ञांनी इशारा दिला आहे. तसाच इशारा पुण्यातील मेट्रोबाबतही देण्यात आला आहे. मेट्रो रेल्वे नदीपात्रातून जाऊ नये, असे जलतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, काहींजण प्रसिध्दीच्या झोतात येण्यासाठी घाईघाईने घोषणा करत आहेत. मात्र यासर्व घोषणांचा विचार न केल्यास भविष्यात त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे ठाकरे यांनी सांगितले. नोटाबंदीमुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. काहींचा बॅंकाच्या रांगेत उभे राहून मृत्यु झाला आहे, याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही. केंद्राचा अर्थसंकल्प जवळ आला असून आयकर कमी करावा, देशभरातील शेतकऱ्यांना कर्जमाफ करावे, अशी आमची मुख्य मागणी असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच मुंबईकर पुन्हा एकदा शिवसेनेवरच विश्वास दाखवतील आणि वचननाम्यातील योजलेली पुढची कामे करण्यासाठी सेनेला भरघोस मतांनी विजयी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शिवसेना-भाजप युतीबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना ठाकरे म्हणाले की, युतीची बोलणी चालू असून ही बोलणी यशस्वी झाली आणि युती झालीच तर भाजपच्या काही चांगल्या सूचनांचा आम्ही वचननाम्याकरिता नक्कीच स्वीकार करू असे नमूद केले.
मुंबईद्रोही!भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर माफीयाराजचा आरोप करत असतात, याबद्दल उध्दव यांना छेडले असता माझ्याविरोधात बोलेल तो मुंबईद्रोही आहे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच माफियांना सोबत घेणारेच माफियांबद्दल बोलताहेत. मात्र, शिवसेनेकडे प्रत्येक आरोपाचं उत्तर तयार आहे, असेही उद्धव यांनी ठणकावले.
नागपूर महापालिकेतही खड्डे मुंबईत दोन हजार किमीचे रस्त्यांचे काम सुरु आहे. अनेक रस्ते सिमेंटकरण करण्यात येत आहेत. मात्र, मुंबईतील रस्त्यावर ४४ संस्थामार्फत खोदकाम केले जाते. यावरही नियंत्रण आणण्याची गरज आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन खड्ड्यांवर कायमस्वरुपी तोडगा निघेल आणि खड्डे कसे पडणार नाही यावर आमचा भर आहेच. परंतु, केवळ मुंबईतच खड्डे आहेत, असे नाही तर खड्ड्यांचा विषय नागपूरमहापालिकेतही गाजल्याचे ठाकरे यांनी सांगत, ठाकरेंनी भाजपला चिमटा काढला.
शिवसेनेच्या वचननाम्यातील महत्त्वाचे मुद्देपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पालिकेच नोकरी प्राधान्य, वारकरी भवनाच्या धर्तीवर मुंबईत डबेवाला भवन उभारणार, सर्व मनपा कर्मचाऱ्यांना आरोग्य विम्याचे कवच, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणार, शालेय गणवेशातल्या विद्यार्थ्यांना बेस्टचा मोफत पास, मुंबईतल्या सर्व रेल्वे स्थानकांजवळ दुचाकी स्थानक उभारणार, मुंबईत चार मोठे जलतरण तलाव उभारले जाणार आहेत.

Post a Comment