मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) – पालिकेमार्फत भांडुप संकुल येथील उदंचन केंद्रात १२०० मि.मी. व्यासाची बटरफ्लाय झडप बदलण्याचे काम करण्याचे प्रस्तावित आहे.सदर काम मंगळवार,येत्या ३१ जानेवारी, रोजी सकाळी ९.०० वाजेपासून ते रात्री ९ वाजेपर्यंत १२ तासांसाठी हाती घेण्यात येणार आहे. सदर कामाच्या कालावधीत शहरातील ए, सी, डी, जी/दक्षिण,जी/उत्तर या विभागात २० टक्के पाणी कपात करण्यात येईल. तर पश्चिम उपनगरातील सर्व विभागात (वांद्रे ते दहिसर) २० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे तरी सदर नमूद केलेल्या परिसरामधील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून अगोदरच्या दिवशी पुरेसा पाणीसाठा करावा व पाणी काटकसरीने वापरुन पालिका प्रशासनास योग्य ते सहकार्य करावे असे आवाहन पालिकेने केले आहे
Post a Comment