टाटा समूह, सायरस मिस्त्री आणि नसली वाडिया यांच्यातील वादाने आता नवे वळण घेतले आहे. टाटा स्टीलच्या स्वतंत्र संचालकपदावरुन हकालपट्टी करण्यात आल्यानंतर काही तासांतच नसली वाडिया यांनी टाटा सन्स आणि रतन टाटा यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. नसली वाडियांच्या या निर्णयामुळे टाटा समूहातील वाद आणखी चिघळण्याची चिन्हे निर्माण झाले आहे.
विशष म्हणजे मंगळवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण बैठकीत ९० टक्के समभागधारकांनी नसली वाडियांना काढून टाकण्याच्या प्रस्तावाला अनुमोदन दिल्यानंतर त्यांना या पदावरुन काढून टाकण्यात आले होते. टाटा सन्सच्या अधिकाऱ्यांनी आणि संचालक मंडळांनी समभागधारकांना आधीच सूचना दिलेल्या होत्या असा आरोप करीत नसली वाडिया हे या बैठकीपासून दूरच राहिले होते.
Post a Comment