मुंबई शुक्रवार ( प्रतिनिधी ) – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या महत्वाच्या माझगाव येथील बीआयटी चाळीचा पुनर्विकास विकासकाकडून केला जात आहे. या चाळींचा पुनर्विकास विकासकाकडून केला जात असताना चाळींवर पालिकेकडूनही करोडो रुपये खर्च केले जात आहेत. पालिकेकडून बीआयटी चाळीवर उधळपट्टी केली जात असल्याने या संपूर्ण प्रकरणाची लाच लुचपत विभागाकडून चौकशी करण्याचे आदेश महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी दिले आहेत.
माझगांव बीआयटी चाळीमधील नागरिकांना सोयी सुविधा देण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने ३१ कोटी ६७ लाख रुपये खर्च केले आहेत. या खर्चाला मंजुरी देण्यासाठी पालिकेच्या स्थायी समितीत पुन्हा प्रस्ताव आला होता. या प्रस्तावावर बोलताना बीआयटीच्या १६ इमारतींचा २००६ पासून विकासकाच्या माध्यमाने पुनर्विकास केला जात आहे. विकासकाने २००६ पासून अद्याप १६ पैकी ५ इमारती पाडल्या आहेत. विकासकाकडून इमारतींचा पुनर्विकास करताना दुरुस्ती करण्याचे आणि सोयी सुविधा देण्याचे काम विकासकाचे आहे. असे असताना महापालिकेने सध्या असलेल्या व जागेवर उभ्या नाहीत अश्या इमारतींवर ३१ कोटी ६७ लाख रुपये खर्च केले आहेत. इमारती ज्या उभ्या आहेत त्यावर विकासकाने खर्च करणे गरजेचे आहे. पालिकेने अश्या इमारतींवर जो खरंच केला आहे तो खर्च विकासकाकडून वसूल करावा. व ज्या इमारती विकासकाने पाडल्या आहेत त्या इमारतींवरही पालिकेने खर्च केल्याचे दाखवले आहे. मी या ठिकाणी राहत असल्याने पालिकेने कोणताही खर्च केला नसल्याचे पहिले आहे. तरीही पालिकेच्या प्रस्तावात पाडण्यात आलेल्या इमारतींवर खरंच केल्याचे म्हटले आहे. पालिकेने हि उधळपट्टी केल्याचे उघड होईल म्हणून जाणूनबुजून हा प्रस्ताव २० महिने उशिरा आणल्याचे जाधव यांनी संगीतले. बीआयटी चाळीवर उधळपट्टी केले जात असल्याचे उघड झाले असल्याने २००६ पासून या इमारतींवर खर्च केले असण्याची शक्यता असल्याने २००६ पासून बीआयटी चाळीवर केलेल्या खर्चाची चौकशी लाच लुचपत विभागाकडून करावी अशी मागणी जाधव यांनी केली.
याबाबत हे प्रकरण गंभीर असल्याने पालिका अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी दक्षता विभागाकडून किंवा शहर विभागाच्या अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून चौकशी करण्याची तयारी दर्शवली. अतिरिक्त आयुक्त शहर यांच्याकडे या आधीही इतर प्रकरणांमध्ये चौकशीची मागणी केल्यावर त्या चौकशीचे आदेश देतात मात्र त्यांच्या खालील अधिकारी चौकशीच करत नाहीत यामुळे या प्रकरणाची चौकशी लाच लुचपत विभागाकडून चौकशी करावी अशी मागणी जाधव यांनी केली. जाधव यांच्या मागणीला सर्वच पक्षाच्या सदस्यांनी पाठिंबा दिल्याने अखेर स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी या प्रकारांची चौकशी लाचलुचपत विभागाकडून करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
Post a Comment