मुंबई सोमवार ( प्रतिनिधी ) – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील गेल्या वर्षी रर-ते कामांच्या घोटाळ्यामधील दुसऱ्या टप्प्यातील चौकशीचा अहवाल मोठ्या कालावधी नंतर पूर्ण केल्यानंतर यामध्ये दोषी असलेल्या 11 कंत्राटदाराना कारणे दाखवा नोटिस बजावली मात्र त्यानंतरची ही धडक कारवाईची प्रक्रिया अद्याप धीम्या गतीने सुरू आहे नोटिशिना उत्तर देण्यासाठी कत्राटदारानी मागितलेली 15 दिवसाची मुदत केव्हाच संपली असून पालिका धडक कारवाई केव्हा करणार की नाही असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत पालिका कंत्राटदारांवर कारवाई करणार की नाही याकडे सवाॅचे लक्ष लागून राहिले आहे
मुंबईतील रर-त्यांची कामे पालिका दरवर्षी पावसाच्या अगोदर हाती घेते त्यासाठी दरवर्षी कोटय़वधी रुपये खर्च करत आहे एवढा खर्च करून ही रर-त्यांची कामे निट होत नसल्याने रर-त्यांची दुरावस्था मोठ्या प्रमाणात होत आहे पालिकेचे कोटयावधी रुपये रर-त्यात फूकट जात आहेत तसेच या कामावर पालिकेचे लक्ष नसल्याने कंत्राटदारांचे फावत आहे गेल्या वर्षी या रर-त्यांच्या कामाबाबत घोटाळा उजेडात आला त्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागी झाली आणि या घोटाळ्यातील दोषी कंत्राटदारांवर कारवाई सुरू केली मात्र ही पालिकेची कारवाई एकदम धिम्या गतीने सुरू आहे पालिका ही कारवाई जलद गतीने का करत नाही पालिका या दोषीं कंत्राटदारांना पाठिशी घालत आहे का असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे रस्ते घोटाळा उघडकीस आल्यानंतर पालिकेने चौकशी समिती नियुक्त केली आहे. पहिल्या टप्प्यातील 34 रस्त्यांच्या अहवालानुसार दोषी कत्राटदार व आधिकारयांवर पालिकेने काही महिन्यांपूर्वी कारवाई केली. उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील 200 रस्त्यांचा चौकशी अहवालही वर्षभराच्या कालावधी नंतर पूर्ण केला यामध्ये 11 कत्राटदार दोषी आढळले. दीड महीन्यापूर्वी या कत्राटदाराना पालिकेने कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. याचवेळी कंत्राटदार कंपन्यांची नोंदणी तात्पुरत्या स्वरुपात रद्द् करण्यात आली असून त्यांना यापुढे पालिकेची नवीन कंत्राटे द्यायची नाहीत असा निर्णय घेतला आहे. मात्र काळ्या यादीत टाकण्याच्या भीतीने या सर्व कंत्राटदारानी नोटिशिला उत्तर देण्यासाठी 15 दिवसाची मुदतवाढ पालिकेकडे मागितली. चौकशीत दोषी आढळलेल्या कत्राटदारांवर थेट एफआयआर केल्यास बचावाची कोणतीही संधी न दिल्याचा दावा करुन ते न्यायालयात दाद मागु शकतात त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटिस पाठवण्यात आली. नोटशीना उत्तर देण्याची मुदतवाढ कधीच संपली आहे, मात्र अद्याप कारवाईची प्रक्रिया पुढे सरकलेली दिसत नाही याबाबत आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. पहिल्या टप्प्यातील 34 रस्त्यांच्या कामात दोषींवर कारवाई झाली. मात्र उर्वरित 200 रस्त्यांच्या कामांतील दोषींवर कारवाईला उशीर होत असल्याने मोठय़ा प्रमाणात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान सद्या रस्ते बांधणी व् नाले सफाईवरुन वाद सुरु आहे. त्यामुळे त्यात या वादाची अजून भर नको, यासाठी रस्ते घोटाळ्यातील कारवाईच्या प्रक्रियेला उशीर केला जात आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत
Post a Comment