ओल्या कच-यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्याकडे दुर्लक्ष
मुंबई रविवार ( प्रतिनिधी ) – मुंबईतील 20 हजार चौ. मीटर व त्यापेक्षा अधिक चटईक्षेत्र असलेल्या गृहनिर्माण आणि व्यावसायिक संकुलांना ओल्या कच-यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र याकडे निम्म्याहुन अधिक सोसायटी, संकुलानी दुर्लक्ष केल्याने पालिकेने नियमानुसार नोटिसा बजावणे सुरु केले आहे. पण तरीही दुर्लक्ष झाल्यास अशा सोसायट्या व संकुलांचा वीज व पाणी पुरवठा खंडीत केला जाणार आहे.
कचऱ्याची व्हिलेवाट योग्य प्रकारे व्हावी यासाठी पालिकेने कामाला सुरुवात केली आहे. ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी पालिकेचे गृहनिर्माण सोसायटयाना आदेश आहेत. विविध योजनाही आखल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबईतील 20 हजार चौरस मीटर व त्यापेक्षा अधिक चटईक्षेत्र असलेल्या गृहनिर्माण व व्यावसायिक संकुलांना ओल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करणे बंधनकारक केले आहे. पालिकेने दोन महिन्यांपूर्वी तसे आदेश दिले होते. मात्र दोन महिन्यात निम्म्यापेक्षा अधिक सोसायट्यानी पालिकेचा आदेश धाब्यावर बसवत दुर्लक्ष केले आहे. पालिकेने याबाबत नुकताच आढावा घेऊन अशा सोसायट्याना नोटिसा बजाण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील ज्या सोसायट्या व व्यावसायिक संकुले प्रक्रिया करण्याकडे दुर्लक्ष करतील त्यांना नोटिस देऊन हिअरिंग घेतले जाईल. ठराविक मुदत देऊन प्रक्रिया सुरु करण्यासाठी सांगितले जाणार आहे. मात्र त्यानंतरही आदेश धाब्यावर बसवल्यास पालिकेने सबंधित सोसायट्या व संकुलांचा नियमानुसार वीज व् पाणी पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे विभागवार आदेशही देण्यात आले असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
Post a Comment