मुंबईतील छायाचित्रकारांसाठी ‘मुंबई’ या विषयावर खुली छायाचित्र स्पर्धा

मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) – पालिकेच्या शिक्षण विभाग - संगीत व कला अकादमीच्या कला विभागातर्फे मुंबईतील छायाचित्रकारांसाठी व पालिकेतील कर्मचाऱयांसाठी खुली छायाचित्र स्पर्धा ०३ ते २० मार्च, या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. मुंबईतील दैनंदिन जीवन, सण, उत्सव, बाजार, आरोग्य सेवा, शैक्षणिक जीवन, वाहतूक, समुद्रकिनारा, उद्योग, मुंबईतील इमारती, वास्तुशिल्प, प्रार्थनास्थळे अशी विविधांगी वैशिष्टय़पूर्ण मुंबईचे दर्शन घडविणारी नाविण्यपूर्ण, कलात्मक छायाचित्रे या स्पर्धेसाठी अपेक्षित आहेत. मुंबईतील छायाचित्रकांरानी या स्पर्धेत मोठय़ा संख्येने सहभागी होण्यासाठी पालिका प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

पालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने गत अनेक वर्षांपासून ‘मुंबई’ या विषयावर खुली छायाचित्र स्पर्धा आयोजिली जाते. जागतिक स्तरावरील मुंबईचे स्थान लक्षात घेऊन पालिका प्रशासन नाविण्यपूर्ण संकल्पना घेऊन मुंबई अधिक आकर्षक व आधुनिक बनविण्यासाठी प्रयत्नशील आहे. मुंबईत कल्पक अशा छायाचित्रकारांची गणना आहे. या कलाकारांच्या माध्यमातून मुंबईला अधिक नाविण्यपूर्ण बनविण्यासाठी ही स्पर्धा आयोजिली जाते. स्पर्धा ही खुल्या स्वरुपात असून २० मार्च, पर्यंत शिक्षणाधिकारी यांचे कार्यालय, संगीत व कला अकादमी, कला विभाग, कक्ष क्र. २०७, दुसरा मजला, पालिका शालेय इमारत, ल. न. मार्ग, हिंदू कॉलनी, दादर (पूर्व), या पत्त्यावर इच्छुक स्पर्धकांनी जास्तीत जास्त चार कृष्णधवल किंवा रंगीत छायाचित्र स्वतः ११ ते ४ या वेळेत सादर करण्याचे आवाहन केले आहे. छायाचित्रकाराचा आकार ८ x १२ इंच किंवा १० x १२ इंच असावा. यापेक्षा कमी अथवा जास्त आकार नसावा. डिजिटल मिक्सिंग अथवा कॉम्प्युटरवर मिक्सिंग केलेली छायाचित्रे स्पर्धेसाठी पाठवू नयेत. छायाचित्रांच्यामागे सुवाच्च अक्षरात मराठी अथवा इंग्रजीत स्वतःचे नांव, व्यवसाय, खाते, पत्ता, दूरध्वनी क्रमांक व गट लिहावा. तसेच आवश्यकता वाटल्यास छायाचित्रास शिर्षक द्यावे. ‘मुंबई’ खुली स्पर्धा ही दोन गटात होणार आहे.

या स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी कला विभागाचे प्राचार्य दिनकर पवार (भ्रमणध्वनी क्रमांक ८१०८८१११५८), कला शिक्षक निनाद पाटील (भ्रमणध्वनी क्रमांक ९८६७८०८६५०) व कला शिक्षक पुरेंद्रकुमार देवगिरकर (भ्रमणध्वनी क्रमांक ९९६७५८२७५४) यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget