मुंबई, शुक्रवार (प्रतिनिधी)- देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील काही भागांत अपूरा पाणी पुरवठा होतो. अनेक ठिकाणी कमी दाबामुळे पाणीच मिळत नाही, परिणामी नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते, अशा तक्रारी नगरसेवकांनी समितीच्या बैठकीत केल्या. या तक्रारी जाणून घेण्यासाठी जल विभागाचा एकही अधिकारी बैठकीला उपस्थित नसल्याने नगरसेवक संतप्त झाले. पाण्यासारख्या महत्वाच्या विषयावर चर्चा सुरू असताना अधिकारी गैरहजर कसे राहू शकतात, असा जाब त्यांनी प्रशासनाला विचारला. प्रशासनाकडून याचा खुलासा करताना अधिकारी अर्थसंकल्पाच्या कामाला अधिकारी गेल्याचे सांगत वेळ मारून नेली.
भंगारवाडा टेकडी जलायशाच्या झडपा बदलण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी आला होता. याप्रस्तावावर चर्चा करताना नगरसेवकांनी विभागात पाण्याबाबत भेडसावणाऱ्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेढले. अंधेरी पूर्व व पश्चिम भागातील अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी येते. त्यात पाण्याच्या वेळाही एकसारख्याच असल्याने काही ठिकाणी पाणीच मिळत नाही. परिणामी नागरिकांची गैरसोय होते. याबाबत पालिकेच्या जलविभागाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. परंतु, प्रशासनाकडून त्याची दखली जात नाही, असा मुद्दा शिवसेनेच्या नगरसेविका राजूल पटेल यांनी उपस्थित केला. डोंगराळ किंवा झोपडपट्टी भागात हीच समस्या गेल्या १५ वर्षापासून आहेत. मात्र, नव्याने झालेल्या इमारतींना प्रेशरने पाणी पुरवठा कसा होतो, असा संतप्त प्रश्न सर्वपक्षीय नगरसेवकांनी उपस्थित केला. त्यामुळे पालिकेने झोपडपट्टी किंवा डोंगराळ भागात सुरळीत पाणी पुरवठा कसा होईल, याबाबत तातडीची व्यवस्था करा, तसेच एकाच विभागातील पाण्याच्या वेळा बदलण्यात याव्यात, अशा सूचना नगरसेवकांनी केल्या. या सूचनांची दखल घेण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.
बैठकीला जल विभाग अधिकारी अनुपस्थित पाण्यासारख्या महत्वाच्या विषयावर चर्चा सुरु असताना पालिका जल विभागाचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी सभागृह डोक्यावर घेतले. समितीला गृहीत धरू नका, असा इशारा सर्वपक्षिय सदस्यांनी दिला. तसेच संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्येक बैठकीला उपस्थित राहण्याचे फर्मान समिती अध्यक्षांनी अतिरिक्त आयुक्तांना दिले आहेत.

Post a Comment