मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) मुंबई पालिकेमध्ये सुमारे एक लाख अकरा हजार कर्मचारी काम करत आहेत या पालिका कर्मचा-यांच्या कामाचे तास वाढवून ८ तास करण्यात येणार आहेत. उद्या जागतिक महिला दिनी याबाबत ठोस, निर्णय घेण्यात येणार आहे. परंतु, मोठ्या संख्येने महीला लांब राहात असल्यामुळे त्यांना अधिक काळ थांबणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन पालिका कर्मचा-यांनी मुंबई पालिकेच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. इतकेच नाही तर मुंबई पालिका कार्यालयीन कर्मचारी संघटनेने आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
या निर्णयाबाबत मुंबई पालिका प्रशासनाने उद्या संघटनांना चर्चेसाठी बोलावले आहे. पालिका प्रशासनाकडून कर्मचा-यांना मिळत असलेल्या अनेक सवलती काढून घेण्याचे प्रयत्न चालवले असून आता त्यात भरीस भर म्हणून पालिका कर्मचा-यांचे कामाचे तास ७ वरून ८ तास करण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याबाबत मुंबई पालिका कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अॅड. प्रकाश देवदास तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई पालिकेच्या कार्यालयांमध्ये ७० ते ८० टक्के महीला कर्मचारी असून ८ मार्च हा जागतिक महीला दिन साजरा केला जातो. त्याचदिवशी कार्यालयातील कामाचे तास वाढविण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाकडून केला जात असल्याचे अॅड. देवदास यांनी सांगितले.

Post a Comment