मुंबईत पंधरा दिवस दहा टक्के पाणीकपात

मुंबई मंगळवार ( प्रतिनिधी ) – येत्या २५ मार्च, ते ०८ एप्रिल, २०१७ या कालावधीत शहर विभागातील ए, सी, डी, जी/दक्षिण, जी/उत्तर तसेच संपूर्ण पश्चिम उपनगरात आणि पूर्व उपनगरातील एल, एन व एस विभागात १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे

पालिकेमार्फत गुंदवली - कापूरबावडी - भांडुप या जलबोगद्यात कापूरबावडी व भांडुप संकुल येथे झडपा बसविण्याचे काम करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे हे काम येत्या शनिवार, २५ मार्च, ते शनिवार, ०८ एप्रिल, या १५ दिवसांच्या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे. सदर कामाच्या कालावधीत शहर विभागातील ए, सी, डी, जी/दक्षिण,जी/उत्तर या विभागात तसेच पश्चिम उपनगरातील सर्व विभागात (वांद्रे ते दहिसर) आणि पूर्व उपनगरातील एल, एन व एस विभागात १० टक्के पाणी कपात केली आहे तरी सदर नमूद केलेल्या परिसरामधील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाणी कपातीच्या कालावधीत पाणी जपून वापरावे व पालिका प्रशासनास योग्य ते सहकार्य करावे असे आवाहन पालिकेने केले आहे.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget