मुंबईकरांना जुलै अखेर पर्यंत पुरेल एवढा तलावात पाणी साठा उपलब्ध

मुंबई ( प्रतिनिधी ) - मुंबईला पाणी पुरवठा करणा-या तलाव क्षेत्रात सध्या 6 लाख 17 हजार 846 दक्षलक्ष लिटर पाणी उपलब्ध असून मुंबईकरांना येत्या जुलै अखेर पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा तलाव क्षेत्रात पाणी साठा चांगला आहे अशी माहिती पालिका जलअभियंता अशोककुमार तवाडीया यांनी दिली

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला पालिका मोडक सागर , तानसा , विहार, तुळशी , अप्पर वैतरणा , भातसा , आणि मध्य वैतरणा या सात तलावातून पाणी पुरवठा करत आहे या मुंबापुरीत राहत असलेल्या सुमारे दिड कोटी जनतेला पालिका दररोज तीन हजार 750 दक्षलक्ष लिटर पाणी पुरवठा करत आहे सध्या या सातही तलाव क्षेत्रात 6 लाख 17 हजार 846 दक्षलक्ष लिटर गेल्या वर्षी याच कालावधीत या सातही तलावात 4 लाख 46 हजार 258 तर त्या मागील वर्षी याच कालावधीत या सातही तलावात 5 लाख 34 हजार 834 दक्षलक्ष लिटर या दोन वषाॅच्या तुलनेत यंदा तलाव क्षेत्रात चांगला पाणी साठा आहे त्यामुळे मुंबईकरांना जुलै अखेर पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे गेल्या वर्षी या सातही तलावात चांगला पाऊस पडला त्यामुळे सवॅ तलाव भरून वाहू लागले होते यंदाही चांगला आणि लवकर पाऊस पडेल असे संकेत हवामान खात्याने दिले आहेत त्यामुळे मुंबईकरांना घाबरण्याची आवश्यकता नाही पालिकेने कापूरवाडी येथे जलवाहिनीला वाॅल बसण्याचे काम गेल्या चार पाच दिवसापासून सुरू केल्याने संपूर्ण मुंबईत 10 टक्के पाणीकपात केली आहे ही पाणी कपात 8 एप्रिल पर्यंत लागू असणार ही 10 टक्के पाणीकपात मुंबईला दररोज होणाऱ्या तीन हजार 750 दक्षलक्ष लिटर पाण्यातून होत आहे ही 10 टक्के पाणीकपात असल्याने डोंगराळ भागावर पाणी टंचाईचा परिणाम होत आहे मात्र हे वाॅल बसण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईकरांना पूर्वी प्रमाणे म्हणजे 3 हजार 750 दक्षलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जाईल
मुंबईकरांना जुलै अखेर पर्यंत पाणी पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट कोसळणार नसल्याचे दिसत आहे

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget