मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – पालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे दरवर्षी फेब्रुवारी तीन ते चार तारीखला जाहीर होणारा पालिकेचा अर्थसंकल्प, आता २3 मार्च नंतर स्थायी समितीत मांडण्यात येणार आहे. महापालिका अधिनियमानुसार स्थायी समितीला सादर करण्यात आल्यानंतर, तो अंमलात आणण्याची तरतूद असल्याने ३१ मार्चपूर्वी त्याला मंजुरी मिळणे अपेक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पालिकेचा सन २०१७-२०१८ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर होणे अपेक्षित होता. महापालिका आयुक्तांमार्फत हा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष यांना सादर करण्यात येतो. यामध्ये त्या-त्या आर्थिक वर्षातील विकासकामे, नव्या योजना, कर आणि दरवाढ, तसेच इतर नागरी पायाभूत सेवा सुविधांचा समावेश असतो, परंतु यंदा महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे, हा अर्थसंकल्प 23 मार्चनंतर सादर केला जाणार आहे.
Post a Comment