मुंबई बुधवार ( प्रतिनिधी ) – पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २१ फेब्रुवारी, रोजी होत असून या निवडणुकीच्या कामाकरीता नेमण्यात आलेल्या शिक्षकांना ३ फेब्रुवारी,रोजी प्रशिक्षण देण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे काम या शिक्षकांना आले असल्याने, ०३ फेब्रुवारी, रोजी त्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण रद्द करण्यात आले आहे. तथापि, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या निर्देशानुसार या सर्व शिक्षकांकरीता १३ फेब्रुवारी, रोजी सायंकाळी ५.०० ते ७.०० या वेळेत विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
सदर प्रशिक्षण या अगोदर त्यांना कळविण्यात आलेल्या ना. म. जोशी मार्ग महापालिका शाळा, करी रोड (पश्चिम) या केंद्रावर देण्यात येणार आहे तरी सर्व शिक्षकांनी या विशेष प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.३ फेब्रुवारी, रोजीचे निवडणुकविषयक प्रशिक्षण रद्द झाल्याची सूचना संबंधित कार्यालयांना या अगोदरच देण्यात आली आहे. तरी प्रशिक्षणासाठी नेमलेल्या शिक्षकांनी १३ फेब्रुवारी, रोजीच्या विशेष प्रशिक्षणास उपस्थित रहावे, असे आवाहन उपायुक्त (करनिर्धारण व संकलन) डॉ. बापू पवार यांनी केले आहे.

Post a Comment