नवी दिल्ली : पेटीएमला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून पेमेंट बँकेसाठी अंतिम मंजुरी मिळाली आहे. आपल्या पेमेंट बँकेचे कामकाज पुढील महिन्यात सुरू होण्याची आशा आहे, असे कंपनीने म्हटले आहे. पेमेंट बँक लोकांना आणि छोट्या व्यावसायिकांकडून प्रति खाते एक लाख रुपयांपर्यंतची ठेव घेऊ शकते.
'वन९७ कम्युनिकेशन्स'चे संस्थापक विजय शेखर शर्मा एका ब्लॉगपोस्टमध्ये म्हणातात, 'रिझर्व्ह बँकेने आज औपचारिकरीत्या पेटीएम पेमेंट बँक सुरू करण्याला मंजूरी दिलेली आहे. आम्ही याला आपल्यासमोर आणण्यास आणखी वाट पाहू देणार नाही. पेटीएम पेमेंट बँकेमध्ये आमचे उद्दिष्ट बँकिंग उद्योगात नवीन व्यावसायिक मॉडेल बनवणे, बँकिंग सुविधांशी वंचित किंवा कमी बँंकिंग सुविधा असणार्या भारतीयांना आर्थिक सेवेच्या कक्षेत आणणे असे आहे. याबाबत संपर्क केला असता पेटीएम प्रवक्ता म्हणाला की, आपल्या पेमेंट बँकेचे कामकाज फेब्रुवारी महिन्यात सुरू होऊ शकेल आणि पहिली शाखा नोएडा-उत्तर प्रदेश येथे उघडण्यात येईल. पेटीएमला यापूर्वी दिवाळीतच कामकाज सुरू करायचे होते. २0१५ मध्ये रिझर्व्ह बँकेने 'वन९७ कम्युनिकेशन्स'चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना यासाठी 'सिद्धांतिक मंजुरी' दिली होती, त्यांना इतर दहा जणांसोबतच पेमेंट बँकेची स्थापना करण्याची मंजुरी मिळाली होती. यानंतर टेक महिंद्रा, चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी तथा दिलीप सांघवी, आयडीएफसी तथा टेलीनॉर फायनान्सीयला सर्व्हिसेसचा संयुक्त उपक्रम पेमेंट बँक या तीन युनिट्सनी आपल्या लायसंेसिंगमधून माघार घेतलेली होती. सध्या फक्त एअरटेलने पेमेंट बँक कामकाज सुरू केले आहे. आदित्य बिर्ला पेमेंट बँक २0१७ च्या पहिल्या सहामाहीत आपले कामकाज सुरू करेल. पेटीएम पेमेंट बँकेत शर्मा यांची बहुतांशी भागीदारी असेल. उर्वरित भागीदारी 'वन९७ कम्युनिकेशन्स'कडे असेल.
Post a Comment