खो-खो : मुंबई मनपा, परे आणि श्री सर्मथ उपांत्य फेरीत

मुंबई : मुंबई जिल्हा व्यावसायिक अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत मुंबई महानगरपालिका, पश्‍चिम रेल्वे तसेच श्री सर्मथ संघाने उपांत्य फेरीत धडक मारली. मुंबई मनपाने मुंबई पोलिसांचा, तर पश्‍चिम रेल्वेने नेव्हल डॉक संघाला पराभूत केले. श्री सर्मथने परळच्या युवक क्रीडा मंडळाला मात दिली.
४ फुट ११ इंचांची कुमारांची प्रायोगिक खो-खो गटाच्या उपउपांत्य फेरीत श्री सर्मथ व्यायाम मंदिराच्या संघाने युवक क्रीडा मंडळाचा ४ विरुद्ध १ असा ३ गुणांनी पराभव केला. मध्यंतराला श्री सर्मथकडे नाममात्र एक गुणाची आघाडी होती. त्यामुळे सामना रंगतदार होणार, अशी चिन्हे दिसत होती. मात्र, श्री सर्मथच्या जतीन गावकरने नाबाद ७ मिनिटांची खेळी करत सामना पलटवला. श्री सर्मथतर्फे जतीन गावकरने ५ मिनिटे संरक्षण करत २ गडी बाद केले.

व्यावसायिक गटाच्या उपउपांत्य फेरीत पश्‍चिम रेल्वेने नेवल डॉकच्या संघाचा १२ विरुद्ध १२ असा १ गुण आणि ५:३0 मिनिटे राखून पराभव केला. नेव्हल डॉकच्या संघाने तुलनेत बलाढय़ असणार्‍या पश्‍चिम रेल्वेला चांगलीच झुंज दिली. या सामन्यात पश्‍चिम रेल्वेच्या संघाकडून अमोल जाधवने २ मिनिटे संरक्षण केले व ४ गडी बाद करण्यात यश मिळवले. त्याला साथ देत मनोज वार आणि दीपक जाधवने उत्तम कामगिरीची नोंद केली. नेवल डॉककडून वरुण पाटील, अनिकेत आडारकर यांची झुंज दिली.

व्यावसायिक गटाच्या दुसर्‍या उप उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबई महानगरपालिकेच्या संघाने मुंबई पोलिसांच्या संघाचा १७ विरुद्ध १३ असा ४ गुणांनी पराभव केला. या सामन्यात मध्यंतराला एक गुणाची आघाडी महानगरपालिकेकडे होती. मात्र, त्यांनी दुसर्‍या डावात खेळाचा दर्जा उंचावत सामना ४ गुणांच्या फरकाने जिंकला. मुंबई मनपाकडून तुषार मांढरे, अक्षय भांगरे यांनी अष्टपैलू खेळाचा नजराणा सादर केला.

Post a Comment

[blogger]

mumbai sandhya news

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget