मुंबई, मंगळवार (प्रतिनिधी)- पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे या पालिकेत भ्रष्टाचार आणि घोटाळे झाले असताना शिवसेनेकडून डिड यु नो चे होर्डिंग लावले जात आहेत. याविरोधात कॉंग्रेसने आवाज उठवला असून सेनेला खिंडीत गाठण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर केला जाणार आहे. यामुळे पालिका निवडणूक काळात सेना- विरोधात कॉंग्रेस असे सोशल वॉर रंगणार आहे.
शिवसेना व भाजपाची गेली २२ वर्षे मुंबई महानगपालिकेत सत्ता आहे. असे असताना मुंबईकरांना मूलभूत सेवा- सुविधा देण्यास सत्ताधारी सेना- भाजप अपयशी ठरले आहेत. रस्ते, खड्डे, रस्ते दुरुस्ती, टॅब घोटाळा, नाले सफाई, डपिंग घोटाळे झाले आहेत. मात्र तरी हि शिवसेनेने संपूर्ण मुंबईभर ‘‘डिड यू नो’’ ची होर्डिंगबाजी सुरु केली आहे. त्यामुळे पालिकेत झालेल्या अनेक घोटाळ्यांची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी कॉंग्रेस सोशल मीडियाचा वापर करणार आहे. आजपासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. ट्विटर, फेसबुक, व्हाट्स अँप या माध्यमातून सेनेच्या ‘‘डिड यू नो’’ ला मुंबई काँग्रेस उत्तर देणार आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली. कॉंग्रेसच्या या भूमिकेमुळे पालिका निवडणुकीदरम्यान सोशल नेटवर्कवर आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची चिन्हे आहेत.
Post a Comment